पळशीचे सुपुत्र शैलेश गायकवाड यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">ग्रामसेवक ते पोलीस निरीक्षक असा प्रेरणादायी प्रवास <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 413px&rpar; 100vw&comma; 413px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;06&sol;448198143&lowbar;7742672822442560&lowbar;3765843349881201629&lowbar;n&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-585" style&equals;"width&colon;187px&semi;height&colon;auto"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p class&equals;"has-text-align-left">पळशी &lpar;ता&period;कोरेगाव&rpar; येथील सुपुत्र व व खडकी &lpar;पुणे&rpar; येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी सेवारत असलेल्या शैलेश उद्धवराव गायकवाड यांची मुंबई येथे पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे&period; पोलीस दलात आपल्या दमदार आणि कार्यकुशल कामगिरीच्यामुळे त्यांची मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे&period; सुरुवातीला त्यांनी चिपळूण तालुक्यात ग्रामसेवक म्हणून पाच वर्षे सेवा बजावली होती याच दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या मध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली होती&period; आता त्यांची पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याने ग्रामसेवक ते पोलीस निरीक्षक अशा प्रेरणादायी प्रवासाचे कौतुक होत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p class&equals;"has-text-align-left">शैलेश गायकवाड यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पळशी हे आहे&period; दुष्काळी भागातील पळशी सारख्या छोट्या गावातून प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट निवडली&comma; प्राथमिक शिक्षण पळशी येथे तर माध्यमिक शिक्षण देऊरला झाले&period; पुढे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय फलटण तर वरिष्ट महाविद्यालय शिक्षण कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात पूर्ण केले&period; राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी एकता मंचच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली&period; सुरुवातीला कोकणातील चिपळूण तालुक्यात पाच वर्ष ग्रामसेवक म्हणून सेवा बजावली यावेळी ग्रामविकासाच्या विविध योजनात त्यांनी सक्रिय सहभाग देत गावांच्या विकासात भरीव कामगीरी केली होती&period; आजही त्यांनी सेवा बाजवलेल्या गावाचे ग्रामस्थ शैलेश गायकवाड यांच्या कामगिरीची आठवण काढतात व मार्गदर्शन घेतात हे विशेष &period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पुढे जिद्द व मेहनतीच्या जोरावर २०१० मध्ये त्यांनी पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली&period; पोलीस दलाच्या १०३ बॅच अधिकारी असलेल्या शैलेश गायकवाड यांनी सर्वप्रथम मुंबई कुर्ला येथे उपनिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली त्यानंतर पुणे येथे नागरी हक्क संरक्षण विभागात उल्लेखनीय केले&period; पुढे नागपूर येथील तहसील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत झाले&period; याठिकाणीही सर्वोत्तम कामगिरीचा ठसा उमटवला येथे केंद्रीय ग्रह विभागाच्या बेस्ट पोलीस स्टेशन सर्वेक्षणात तहसील पोलीस ठाणे महाराष्ट्रात पहिले येण्याचा बहुमान पटकावला&period; पुढे पुणे आर्थिक गुन्हे शाखा येथे सेवा बजावल्या नंतर त्यांची नेमणूक पुणे खडकी येथे झाली होती&period; पोलीस दलात प्रशंसनीय व लोकोपयोगी कामगिरीच्या जोरावर त्यांनी वेगळा ठसा उमठवला आहे याकाळात अनेक सन्मानांनी त्यांना वेळोवेळी गौरवण्यात आले&period; नुकतीच त्यांची मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>त्यांच्या या यशाबद्दल पळशी व देऊर ग्रांमस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी&comma; मित्र मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: