Sant Tukaram Maharaj Palkhi: तुकोबारायांचे पंढरीकडे प्रस्थान.. अवघे देहू वैष्णवमय

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">भर पावसात वारकरी टाळ&comma; मृदुंग&comma; वीणेच्या नादात तल्लीन<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Sant Tukaram Maharaj Palkhi भेटी लागी जीवा&comma;  लागलीसी आस या संत उक्तीप्रमाणे विठुरायाच्या भेटीची आस घेऊन लाखो वारकऱ्यांचा मेळा घेऊन जगतगुरु संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने आज टाळ-मृदूंगाच्या तालावर आणि ग्यानबा तुकारामाच्या नामघोषामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान केले&period; राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या हजेरीने देहू नगरी वैष्णवमय झाली&period; दुपारी अडीचच्या सुमारास संत तुकाराम महाराज पादुकांचे पालखीतून प्रस्थान झाले&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आज पहाटेपासून देहूतील देऊळवाड्यात पालखी प्रस्थानची लगबग सुरु होती&period; मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती&period; राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा&comma;अर्चा आणि आरती झाली&period; यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार&comma; राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ&comma;खासदार श्रीरंग बारणे&comma; सुनेत्रा पवार&comma;आमदार सुनील शेळके&comma; आमदार महेश लांडगे यांची यावेळी उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<div class&equals;"wp-block-cover"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1600px&rpar; 100vw&comma; 1600px" class&equals;"wp-block-cover&lowbar;&lowbar;image-background wp-image-1259" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;06&sol;FB&lowbar;IMG&lowbar;1750254623787-1024x681&period;jpg" data-object-fit&equals;"cover"&sol;><span aria-hidden&equals;"true" class&equals;"wp-block-cover&lowbar;&lowbar;background has-background-dim"><&sol;span><div class&equals;"wp-block-cover&lowbar;&lowbar;inner-container is-layout-flow wp-block-cover-is-layout-flow">&NewLine;<p class&equals;"has-text-align-center has-large-font-size"><&sol;p>&NewLine;<&sol;div><&sol;div>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सकाळी प्रस्थानपुर्वी&nbsp&semi;परंपरेप्रमाणे भजनी मंडपात देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले&period;&nbsp&semi;मंदिराच्या प्रागंणात यावेळी वारकऱ्यांची भर पावसात वारकरी टाळ&comma; मृदुंग&comma; वीणेच्या नादात तल्लीन होऊन अभंगाच्या चाली गात नामघोष केला&period; वारकरी पाऊली आणि फुगड्यांचे धरलेले फेर यामुळे वारकऱ्यांचा उत्साह टिपेला पोहचला&period; खांद्यावर पताका&comma; डोईवर तुळस&comma; डोळ्यात तुकोबारायांचे दर्शनाची आस आणि मुखाने ग्यानबा तुकोबाचा जयघोष&nbsp&semi; अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहू नगरी पावसासोबतच भक्तिरसात चिंब झाली&period; रथाच्या पुढे २७ व मागे ३७० दिंड्या सोबत फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथातून&nbsp&semi; तुकोबारायांचा ३४० व्या पालखी सोहळ्याने पंढरपुराकडे पावले ठेवली&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;06&sol;FB&lowbar;IMG&lowbar;1750254633962-1024x681&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1261"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">Sant Tukaram Maharaj Palkhi<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">असा असेल पालखी सोहळ्याचा प्रवास आणि मुक्काम&nbsp&semi;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आजचा मुक्काम इनामदार वाड्यात तर उद्या पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डीला पालखीसोहळ्याचा मुक्काम असेल २० जून रोजी पुणे शहरात मुक्कामाला पोहचेल&period; येथील निवडुंगा विठोबा मंदिरात पालखी विसावेल&period;&period; दोन दिवस पालखी पुणे मुक्कामी असेल येथे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत तुकोबारायांची भेट होईल&period; पुण्यानंतर २३ रोजी लोणी काळभोर&comma; २४ जून-यवत&comma; २५ जून-वरवंड&comma; २६ जून-उंडवंडी&comma; २७ जून-बारामती&comma; ३०जून -सणसर&comma; २९ जून- निमगाव केतकी&comma; ३० जून- इंदापूर&comma; १ जुलै- सराटी&comma; २ जुलै- अकलूज&comma; ३ जुलै- बोरगाव श्रीपूर&comma; ४ जुलै- पिराची करोली&comma; ४ जुलै- वाखरी असा २१ दिवसांचा प्रवास करीत ५ जुलैला पंढरपुरात पोहचेल&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">असे रंगतील रिंगण सोहळे&nbsp&semi;<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण सहा रिंगण पार पडतात यापैकी ३ उभे व ३ गोल रिंगण असतील&period; पहिले गोल रिंगण बेलवडी येथे&comma; दुसरे मेंढ्याचे गोल रिंगण काटेवाडी येथे तर तिसरे गोल रिंगण अकलूज येथे होईल&period; तत्पूर्वी सराटी येथे पादुकांचे निरास्नान होईल&period; तसेच पहिले उभे रिंगण माळीनगर&comma; दुसरे तोंडले बोडले येथे तिसरे वाखरी अंथुर्णे येथे होते&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Sant Tukaram Maharaj Palkhi<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: