तीन दिवसांच्या पाठलागानंतर ‘ती’ चारचाकी अखेर बारामती पोलिसांच्या ताब्यात

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><em>काळया काचा सह साऊंड सिस्टम उतरविली&comma; दंडात्मक कारवाईसह कोर्टात खटला दाखल&semi; वाहतूक पोलिसांची कारवाई<&sol;em><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>बारामती दि&period; ३१<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<pre class&equals;"wp-block-code"><code> तीन दिवसांपासून काळ्या काचा&comma; नंबर प्लेटशिवाय आणि भरधाव वेगाने शहरात भरकटणाऱ्या एका संशयित चारचाकी वाहनाचा अखेर बारामती वाहतूक पोलिसांनी छडा लावला आहे&period; तीन दिवसांच्या पाठलागानंतर ही गाडी ताब्यात घेऊन संबंधित चालकावर कडक कारवाई करण्यात आली आहे&period;&NewLine; २४ मे रोजी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे&comma; प्रशांत चव्हाण&comma; प्रदीप काळे&comma; रूपाली जमदाडे आणि प्रज्योत चव्हाण यांच्यासह काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करत होते&period; याच वेळी भिगवण चौकातून काळया काचा असलेली आणि नंबर प्लेट नसलेली एक चारचाकी भरधाव वेगाने जाताना दिसली&period; पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी थांबली नाही आणि वेगाने निघून गेली&period; यानंतर ती गाडी सिटी इन चौकात थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक पोलीस स्वाती काजळे यांना कळविले&period; काजळे यांनीही सिटी इन चौकात गाडी अडवण्याचा प्रयत्न केला&comma; पण वाहनाने पुन्हा भरधाव वेग घेतला&period; पुढे&comma; &lpar;दि&period;२८ मे&rpar; रोजी तीच गाडी गांधी चौकात वाहतूक पोलीस सीमा घुले आणि रूपाली जमदाडे यांना दिसली&comma; मात्र त्या वेळीही ती थांबवता आली नाही&period; या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जवान सुधाकर जाधव आणि अजिंक्य कदम यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले&period; तसेच परिसरातील नागरिकांची विचारपूस करून संबंधित वाहनाविषयी सविस्तर माहिती मिळवली&period; अखेर बारामती शहरातच ती चारचाकी शोधून काढण्यात आली आणि पोलिसांनी ताब्यात घेतली&period; कृष्णा अभिजीत क्षीरसागर रा&period; माऊली नगर प्रगती नगर रोड बारामती हा चालक ती गाडी चालवत होता आणि त्या गाडीचा वाहन क्रमांक MH 06 AZ 8555 असा असल्याचे तपासात समोर आले&period;<&sol;code><&sol;pre>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सदर वाहनावर काळ्या काचा&comma; नंबर प्लेट नव्हती&comma; विमा नव्हता तसेच पोलीस मॅन्युअलनुसार कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नव्हती&period; यामुळे वाहनचालकावर ३५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून&comma; बेदारकारपणे वाहन चालवणे या प्रकरणी कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे&period; सदर गाडीच्या काळया काचा कमी करण्यात आल्या असून खूप मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम सुद्धा काढण्यात आलेली आहे&period; सध्या सदरची गाडी बारामती वाहतूक शाखा या ठिकाणी डिटेन करण्यात आली आहे&period;<br>ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल&comma; अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या वाहतूक पथकाने केली&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: