कोरेगावच्या नवीन एस. टी. बसस्थानकाचे रुपडे अखेर पालटणार

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">कॉंक्रीटीकरणासाठी तब्बल २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून एस&period; टी&period; महामंडळ आणि एम&period; आय&period; डी&period; सी&period; चा संयुक्त प्रकल्प<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 500px&rpar; 100vw&comma; 500px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2023&sol;12&sol;koregaon-ST&period;png" alt&equals;"" class&equals;"wp-image-498"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगावच्या नवीन एस&period; टी&period; बसस्थानकाचे रुपडे अखेर पालटणार आहे&period; गेली अनेक वर्षे खड्डेमय असलेले वाहनतळ आता चकाचक होणार असून&comma; आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कॉंक्रीटीकरणासाठी तब्बल २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे&period; एस&period; टी&period; महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संयुक्तरित्या हा प्रकल्प पूर्ण करणार आहे&period; नागपूर येथे त्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला&period;<br>१९५२ साली कोरेगावच्या नवीन एस&period; टी&period; बसस्थानकाची पूर्वीच्या नॅरोगेज रेल्वे स्थानकासमोर उभारणी झाली होती&period; तेव्हापासून इमारत आणि परिसराचे नुतनीकरण झालेले नव्हते&period; किरकोळ डागडुजी केली जात होती&comma; मात्र नव्याने सुलभ शौचालय आणि कर्मचारी विश्रांतीगृह उभारण्यापलिकडे नवीन कोणतीही गोष्ट या परिसरात करण्यात आलेली नव्हती&period; बसस्थानक परिसरातील खड्डे&comma; पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल आणि चिखलातून वाट काढत एस&period; टी&period; बसपर्यंत पोहचण्यासाठी प्रवाशांना मोठे दिव्य करावे लागत होते&period;<br>आमदार महेश शिंदे यांनी यासंदर्भात एस&period; टी&period; महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून आढावा घेतला होता&comma; त्याचबरोबर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना बसस्थानक व आगार परिसरासाठी आवश्यक विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करुन घेण्याचे निर्देश दिले होते&period; मुख्यमंत्री ना&period; एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते असल्याने त्यांच्यासमवेत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान चर्चा देखील झाली होती&period;<br>नागपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यादरम्यान सामंजस्य करार मुख्यमंत्री ना&period;एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री ना&period; देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री ना&period; उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला&period; त्यानुसार ६०० कोटी रुपयांचा निधी औद्योगिक विकास महामंडळ उपलब्ध करुन देणार असून&comma; त्याद्वारे राज्यभरातील १९३ एस&period; टी&period; बसस्थानकांचे सुशोभिकरण&comma; सौंदर्यीकरण केले जाणार आहे&period; त्यामध्ये कोरेगावच्या नवीन एस&period; टी&period; बसस्थानकाचा समावेश आहे&period; एस&period; टी&period; बसस्थानकासमोर असलेला कोरेगाव-तडवळे संमत कोरेगाव हा रस्ता देखील कॉंक्रीटीकरण केला जाणार असून&comma; त्याचे काम लवकरच सुरु आहे&period; एकूणच आमदार महेश शिंदे यांनी विशेष लक्ष दिल्याने कोरेगावच्या नवीन बसस्थानकाचे रुपडे आता पालटणार आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong> प्रवासी हितासाठी अत्यंत बारकाईने लक्ष<&sol;strong><br>आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या हितासाठी महामंडळाच्या कारभारावर अत्यंत बारकाईने लक्ष दिले आहे&period; स्वत&colon; त्यांनी अधिकार्‍यांनी वेळोवेळी आढावा घेतलाच आहे&comma; त्याचबरोबर डॉ&period; सौ&period; प्रियाताई महेश शिंदे यांनी दोनदा कोरेगाव आगारास भेटी देऊन तेथील अधिकार्‍यांकडून कामकाजाचा आढावा घेत सुधारणा करण्याविषयी सूचना दिल्या आहेत&period; अधिकार्‍यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकास आता मान्यता मिळाली असून&comma; कोरेगावच्या जुन्या एस&period; टी&period; बसस्थानकाबरोबरच नवीन बसस्थानकाचा विषय मार्गी लागल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: