कमी दरात सोयाबीन खरेदी झाल्यास शेतकऱ्यांसाठी करणार आंदोलन Shashikant Shinde

Soyabin

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">आमदार Shashikant Shinde यांचा इशारा<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या असून&comma; याप्रश्नामध्ये जिल्हाधिकारी&comma; कृषी विभागाने लक्ष घालावे&period; नाही तर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार Shashikant Shinde यांनी दिला आहे&period;<br>आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे&comma; की शासनाने सोयाबीनचा हमीभाव चार हजार ८९२ एवढा जाहीर केला आहे&semi; परंतु प्रत्यक्षात हमीभावाप्रमाणे खरेदी होत नाही&period;<br>खरीप हंगामातील घेवडा व सोयाबीन ही मुख्य पिके आहेत&period; या नगदी पिकांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे अवलंबून आहेत&period; या पार्श्वभूमीवर घेवड्याचा हंगाम जवळजवळ संपत आला आहे&period; आता सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे&period; दसरा&comma; दिवाळी हे सण तोंडावर आहेत&period; दसरा आनंदात साजरा व्हावा&comma; दिवाळी गोड व्हावी&comma; रब्बी हंगामातील पेरणीसाठी मदत व्हावी&comma; यासाठी सोयाबीनला चांगला दर मिळावा या अपेक्षेमध्ये शेतकरी आहेत&period; त्यामुळे पावसापासून बचाव करत करत सोयाबीनची काढणी&comma; मळणी करून शेतकरी तयार माल विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे घेऊन जात आहेत&period; शासनाने सोयाबीनचा हमीभाव चार हजार ८९२ एवढा जाहीर केला आहे&semi; परंतु प्रत्यक्षात हमीभावाप्रमाणे खरेदी होत नाही&period; यापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या आहेत&period; त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे&period; या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांच्या पातळीवर काही उपाययोजनांची कार्यवाही केली जात आहे&period; असे असले तरीही शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची अडवणूक करून व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करत आहेत&period; त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नामध्ये जिल्हाधिकारी&comma; कृषी विभागाने लक्ष घालून सोयाबीनला हमीभावापेक्षा चांगला दर मिळवून देण्यासाठी यंत्रणा कार्यरत उभी करावी&period; नाही तर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे&period; Shashikant Shinde<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;08&sol;PRabhukrupa-auto-1024x598&period;jpg" alt&equals;"Prabhukrupa Automobiles" class&equals;"wp-image-676"&sol;><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: